केंद्रीय जलशक्ती अभियानाचे दोन सदस्य केंद्रीय पथक नागपूर दौ-यावर
- जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : केंद्रीय जलशक्ती अभियानाचे दोन सदस्यीय केंद्रीय पथक नागपूर दौ-यावर आले असून आज त्यांनी शहरातील विविध भागाची पाहणी केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे संचालक अनिल भांदोला आणि सेंटर वॉटर पावर रिसर्च स्टेशन पुणेच्या लता गुप्ता हे दोन सदस्यीय केंद्रीय पथक नागपूर दौऱ्या वर आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी साखरकर, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी अक्षय बेंद्रे ,यांनी नागपुरातील शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची पाहणी केली. यात सुयोग फॅमिली कोर्ट मुक्ताबाई बिल्डींग हायकोर्ट, रवी भवन व जिल्हाधिकारी कार्यालय, बहादुरा या भागाची पाहणी केली. उद्या केंद्रीय पथक काटोल तालुक्यातील खुर्सापार आणि बाजारगाव तसेच कळमेश्वर तालुक्यातील आदासा या ठिकाणी भेट देणार आहेत.
तत्पूर्वी, केंद्रीय पथकासमोर आज जिल्हा परिषदेकडून सादरीकरण करण्यात आले. यात जिल्हा परिषदेकडून जुन्या हातपंपांना दुरुस्त करण्याचे अभियान व खुर्सापार ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण करण्यात आले.
केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाची सुरुवात २९ मार्च २०२२ रोजी करण्यात आली. कॅच दे रेन, व्हेअर इट फाल अँड व्हेन इट फाल हे या अभियानाचे घोषवाक्य आहे.
News - Rajy