महत्वाच्या बातम्या

 वसतिगृह नाही? विद्यार्थ्यांसाठी स्वाधार चा आधार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गडचिरोली यांच्यामार्फत सूचित करण्यात येते की, ज्यातालुक्यात्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांना थेट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरता येतो. 

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, धानोरा, भामरागड, ऐटापल्ली, सिरोंचा, देसाईगंज (वडसा), मुलचेरा या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही आणि गडचिरोली, आरमोरी, अहेरी तालुक्यात फक्त मुलींचे शासकीय वसतिगृह उपलब्ध आहे.व चामोर्शी, गडचिरोली येथे मुलांचे वसतीगृह उपलब्ध आहे.

त्यामुळे वरील तालुक्यांतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहाऐवजी थेट स्वाधार योजनेचाच अर्ज भरणे आवश्यक आहे.तालुक्यांतील काही विद्यार्थ्यांनी नजरचुकीने अन्य तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचा प्रवेश अर्ज सादर केलेला आहे.संबंधित तालुक्यात वसतिगृह अस्तित्वात नसल्याने अशा विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रवेश देणे शक्य नाही.

तरी अशा विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहाचा अर्ज भरला आहे अशा वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी २५ सप्टेंबर २०२६ रोजी पर्यंत संपर्क साधून आपला अर्ज रद्द करण्याबाबतचा लेखी अर्ज (ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आधारकार्ड प्रत व शैक्षणिक संस्थेचे मूळ बोनाफाईड प्रमाणपत्रासह) सादर करावा, जेणेकरून त्यांना विनाविलंब ३० सप्टेंबर २०२६ रोजी पर्यंत स्वाधार योजनेचा अर्ज भरता येईल. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos