महत्वाच्या बातम्या

 गोगावजवळ ट्रक-दुचाकीची जोरदार धडक : २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू


- गडचिरोली-आरमोरी मार्गावर अपघात; ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल, दोन्ही वाहने पोलिसांच्या ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील गोगावजवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भूषण कोमलदास शेंडे २९ वर्षे रा. गोगाव, ता. जि. गडचिरोली असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण शेंडे हा एमएच ३४ बीके ८६३९ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीहून आरमोरी मार्गे गोगावकडे जात होता. दरम्यान, आरमोरीकडून येणाऱ्या एमएच २८ बीबी ७६२४ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भूषण गंभीर जखमी झाला. मात्र, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातप्रकरणी किशोर वासुदेव मांडवगडे ३६ वर्षे रा. गोगाव यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून ट्रकचालक नितीन श्रीराम साबे ४६ वर्षे रा. नांदुरा, जि. बुलढाणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शामराव पाटील पुढील तपास करीत आहेत.





  Print






Related Photos