शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विज देण्याच्या निर्णयात वर्धा जिल्हयाचा समावेश करावा
- खासदार रामदास तडस यांची उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात काम करतांना वन्य प्राण्यांचा धोका आणि कृषीपंपांसाठी 8 तासांच्या वीज उपलब्धतेमुळे पुरेशाप्रमाणात धान पिकास सिंचन होत नसल्याने कृषी पंपांसाठी रोज 8 तासाच्या वीज उपलब्धतेऐवजी या जिल्ह्यातील कृषीपंपांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातही बोर व्याघ्र प्रकल्प, न्यू बोर अभयारण्य अस्तित्वात असून वर्धा जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात काम करतांना वन्य प्राण्यांचा धोका उद्भवतो. यावर्षी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे व आता वीज दिवसा अनुपलब्धतेमुळे बहुतांश शेतकरी संकटात आहेत. या सर्व बाबींचा विचार करून, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याच्या निर्णयात वर्धा जिल्हयाचा समावेश करावा अशी मागणी तसेच विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची सहयांद्री अतिथीगृह मुंबई येथे भेट घेऊन खासदार रामदास तडस यांनी निवेदनाच्या माध्यमातुन केली, यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट व राहुल चोपडा उपस्थित होते.
वर्धा जिल्हयात अतिवृष्टीने मोठया प्रमाणात सोयाबीन, कापुस सहित इतर पिकाचे नुकसान झालेले आहे, नुकसान भरपाई काढण्याकरिता हंगामी पिक, तसेच कापुस पिकाला नियमीत ओलीत होणे आवश्यक आहे, वर्धा जिल्हयात बोर व्याघ्र प्रकल्प, न्यू बोर अभयारण्य अस्तित्वात असल्यामुळे परीसरातच नाही तर वर्धा जिल्हयातील अन्य ठिकाणी रात्रीच्या वेळेस काम करतांना वन्य प्राण्याचा धोका आहे, त्यामुळे विदर्भातील पाच जिल्हयाप्रमाणे वर्धा जिल्हयाचा समावेश केल्यास निश्चीत शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कृषीपंपांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
News - Wardha