महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर भूमिगत खाणीत इंटकची नवी टीम : मोतीलाल वर्मा अध्यक्ष, चेतन गेडाम सचिव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ (इंटक)च्या बल्लारपूर भूमिगत खाण शाखेच्या सन २०२६-२०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या मुख्यालयाकडून ९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे पत्र जारी करण्यात आले असून, नवनिर्वाचित कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने कार्यरत झाली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी मोतीलाल वर्मा, कार्याध्यक्षपदी चंद्रकांत पिंपळकर, तर उपाध्यक्षपदी रामराज निषाद, दिलीप ठाकरे, सर्वणलाल रामभुवन आणि नितेश नगराळे यांची निवड करण्यात आली आहे.

सचिवपदी चेतन गेडाम, संयुक्त सचिवपदी आशिष कुमार सिंह, सुबोदिप भोमिक, राजू शेंडे आणि श्रीधर रावला, तर संघटन सचिवपदी दिलीप टोपो, कमलेश श्रीवास, सुनील बहुरिया, साईनाथ गोहणे, विजय चंद्रया आणि हृषभ वर्मा यांची निवड झाली आहे. रवीकुमार राऊत यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून अजय माणूसमारे, दिलीप जग्गू, विठ्ठल घुगुल, संतोष पोचम, एरेली कुमार, सुनील लांडे, पोगुला रमेश पोचम, कमलेश जुगराज, संदीप शेंडे, कुंदा असुटकर, शबाना खान, संगीता कुबडे, रविशंकर बावरे, शुभम मुळे, सुकरू धुर्वे, राहुल रामटेक, चक्रधर पायपरे, ओडाल मल्लय्या, आनंद मदनय्या, उमेश कुडे, रामकिशन वर्मा, राजनिश लोंढे आणि रमेश जगमोहन यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणीने कामगारांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्यासोबतच क्षेत्राच्या उत्पादन, उत्पादकता, सुरक्षा, कामगार कल्याण आणि सौहार्दपूर्ण औद्योगिक संबंधांना चालना देण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. तसेच औद्योगिक शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी व्यवस्थापन आणि संघटनेमध्ये सहकार्याची भूमिका राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.





  Print






Related Photos