भामरागड तालुक्यात लम्पी स्कीन चर्मरोगावर लसीकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील कोठी येथे 6 ऑक्टोबर 2022 रोजी लम्पी स्कीन चर्मरोगावर लसीकरण करण्यात आले .
संपूर्ण राज्यात लम्पी रोगाचे थैमान सुरू असताना तालुका भामरागड येथे या रोगाचे खूप वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे .या लसीकरण मोहिमेत पशुसंवरधन विभागाला कोठी पोलीस पथकाचा खूप सहयोग लाभला. त्यासोबतच गावाचे सरपंच भाग्यश्री लेखामी यांचा समाज प्रबोधनात महत्वाचा भाग होता. पोलीस ठाण्याचे अधिकारी पी. एस. आय. संजय झराड साहेबांची टीम या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचया मदतीला धावून आली. त्यांनी गावकऱ्यांच्या प्रबोधनाचे आणि पशुसंवर्धन विभागाच्या चमुसोबत घरोगरी जाऊन पशुसंवर्धन विभागाच्या लोकांना मदत केली. या कार्यक्रमात पशुधन विकास अधिकारी डॉ नितीन दुधे, पशुधन विकास अधिकारी डॉ हर्षल रेवतकर ,पशुधन विकास अधिकारी डॉ सागर सूर्जागडे पशुधन पर्यवेक्षक रणदिवे, सुरमवार उपस्थित होते. या वेळेस सर्व शेतकऱ्यांच्या उत्स्पूर्थ प्रतिसाद लाभला ज्यामुळे 1000 च्या वर लसीकरण कोठी या ठिकाणी करण्यात आले.
News - Gadchiroli