महत्वाच्या बातम्या

 मुलगा मुलगी एक समान : नका करू गर्भलिंग निदान


- स्त्रीभृण हत्या करणाऱ्याचे नाव कळवा आणि १ लाख रोख मिळवा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : गर्भलिंग परिक्षण करुन भृण मुलगी असल्यास तिला गर्भातच मारले जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच गर्भलिंग परिक्षण करण्यास प्रवृत्त करणे, प्रेरित करणे, अशा कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दर्शवणे व मदत करणे देखील कायद्याने गंभीर गुन्हा आहे. ज्याकरिता कलम २३ नुसार गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टराला ३ वर्षापर्यत कारावास व १० हजार रुपये दंड होऊ शकतो. तसेच गर्भलिंग निदानाची सेवा मागणारे गर्भवती महिलेचे नातेवाईक, मध्यस्थ व इतर संबंधित व्यक्तीस ३ वर्षापर्यत कारावास व १० हजार रुपये दंड होऊ शकतो.

तरी आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला अशी शंका आली की, सोनोग्राफी सेंटर आणि डॉक्टराकडुन कायद्याचा भंग होत असेल तर त्याबाबतची खबर देणाऱ्या व्यक्तीस १ लाख एवढी रक्कम पारितोषीक म्हणुन ठेवण्यात आली आहे. सदर खबर खरी ठरल्यानंतर व न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर पारितोषीक देण्यात येईल. खबर देणाऱ्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास हेल्पलाईन क्र. १८००२३३४४७५ संकेतस्थळ किंवा (वेबसाईट) www.amchimulgi.gov.in यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos