महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या उपस्थितीत मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय जनसंवाद कार्यक्रम मन की बात च्या १३६ व्या भागाचे सामूहिक प्रक्षेपण गडचिरोली शहरातील शाहूनगर येथील बूथ क्रमांक १०१ वर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते प्रमुख उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संदेशाचे मनोभावे श्रवण केले. कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना अभिवादन, गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांप्रती कृतज्ञता, जलसंवर्धनाचे महत्त्व, तसेच एक पेड माँ के नाम या वृक्षारोपण अभियानाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमानंतर डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थितांशी संवाद साधत पंतप्रधानांनी मांडलेल्या विचारांचा समाजजीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. राष्ट्रसेवा, पर्यावरण संरक्षण आणि जनसहभागाच्या माध्यमातून विकसित भारताच्या उभारणीत प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, बूथ प्रमुख रवी मोहुर्ले, प्रशांत अल्लमपटलावार तसेच स्थानिक नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos