महत्वाच्या बातम्या

 दंतेवाडा : नक्षल्यांचा भ्याड हल्ला, ११ जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / छत्तीसगड : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला असून यामध्ये ११ जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, नक्षलवादी कॅडरच्या उपस्थितीच्या माहितीवरून, दंतेवाडा येथून नक्षलविरोधी कारवायांसाठी डीआरजी दल पाठवण्यात आले. ऑपरेशननंतर परत येत असतांना नक्षलवाद्यांनी अरणपूर रस्त्यावर भूसुरुंगाचा स्फोट केला. या घटनेत ऑपरेशनमध्ये सहभागी १० डीआरजी जवान शहीद झाले असून एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

सदर हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल.

माहितीनुसार, सदर हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जवान ऑपरेशनसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी आयईडीने जवानांनी भरलेले वाहन उडवले आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos