चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणीनंतर आता या गावात सापडली हिऱ्याची खाण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात सोन्याची खाण चर्चेत आल्यानंतर आता हिऱ्याचा खाण..या जिल्ह्यातील घोडेवाही गावात हिऱ्याची खाण असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे ही खाण कुठल्या मैदानात, डोंगळ भागात नाही तर चक्क एका घरात सापडली आहे. ही खाण महिलांच्या राज्य असलेल्या स्वंयपाक घरातील चुलीच्या खाली सापडली आहे. ही घटना घोडेवाही गावातील ज्ञानेश्वर तीवाडे यांच्या घरी घडली आहे. ही घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामपंचायत खाणीचे उत्खनन करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील घोडेवाही आणि पाथरी इथे 1997-98 साली भूगर्भ वैज्ञानिकांनी संशोधन केले होते. त्यावेळी सुमारे पाच कि.मी.च्या परिसरात हिऱ्यांचा साठा असल्याचे संशोधकांनी ग्रामस्थांना सांगितले होते. सुमारे दीड महिना संशोधकांनी गावात ठाण मांडले होते. गावाचा भूगर्भात हिऱ्याची खाण असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली. जमिनीचे भावही वधारले होते. या संशोधनाला पंचवीस वर्षाच्या काळ उलटला. मात्र हिरे बाहेर काढण्यासाठी कुठलीच हालचाल झालेले नाही.
दरम्यान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 व्या शतकापासून वैरागड ,गडचिरोली परिसरात हिरे आढळले होते. इंग्रजांनी पण इथे उत्खनन केले. पण मुबलक हिरे आढळले नाहीत.
News - Chandrapur