केंद्र सरकारने अत्यावश्यक ३९ औषधांच्या किंमती केल्या कमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी मध्ये सुधारणा करताना सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ३९ औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. यामध्ये कर्करोग विरोधी, मधुमेह विरोधी, अँटीव्हायरल, अँटीबैक्टीरियल, अँटीरेट्रोव्हायरल, टीबी विरोधी औषधे तसेच कोविडच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.
NLEM सूचीवर काम करणाऱ्या तज्ञांनी १६ विषम औषधे यादीतून काढून टाकली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च औषधांच्या किमतींवर नियंत्रण वाढवण्यासाठी दीर्घकाळापासून काम करत आहे. किंमतीच्या श्रेणीत आणल्या जाणाऱ्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये टेनेलिग्लिप्टिन, शुगर वरील औषधं (Sugar Medicine), एंटी-टीबी औषधे, आयवरमेक्टिन कोविडची औषधे, रोटावायरस वॅक्सीन या औषधांचा समावेश आहे. २०१५ मध्ये अधिसूचित केलेल्या आणि २०१६ मध्ये अंमलात आणलेल्या NLEM च्या सुधारणेसाठी सरकारने एक अभ्यास सुरू केला होता. औषधांवर स्थायी राष्ट्रीय समितीला कोणती औषधे पुरेशा प्रमाणात आणि विशिष्ट प्रमाणात उपलब्ध असावी याची यादी तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांच्या अध्यक्षतेखालील समिती दुसऱ्या आयोगाकडे ही यादी पाठवते, ज्यामध्ये NITI आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सचिव आणि औषध विभागाचे सचिव यांचा समावेश आहे, जे कोणती औषधे आहेत हे ठरवते. किंमतवर नियंत्रण ठेवण्याचे काम देखील ही संस्था करते.
  Print


News - World | Posted : 2021-09-05Related Photos