महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत जुने रेशन दुकान महिला बचत गटांना देण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक रेशन दुकाने अनेक वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने जोडून ठेवण्यात आल्याने स्थानिक बेरोजगार, पात्र महिला बचत गट तसेच बीपीएल कुटुंबातील महिलांना शासनाच्या योजनांमधून रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता आणि रास्त भाव दुकानदार संघटना गडचिरोली चे कार्यकारी कार्याध्यक्ष रूपेश वलके यांनी शासन व अन्न नागरी पुरवठा विभागाकडे मागणी केली आहे.

रूपेश वलके म्हणतात की, अनेक वर्षांपासून जोडून ठेवण्यात आलेल्या रेशन दुकानांचा तात्काळ जाहीरनामा काढावा आणि ती दुकाने प्राधान्याने बीपीएल महिला बचत गटांना दिली जावीत. त्यांचा असा विश्वास आहे की, महिला बचत गटांना रेशन दुकाने मिळाल्यास ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल तसेच रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होईल.

रूपेश वलके यांनी सांगितले की, शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्याच धर्तीवर रास्त भाव रेशन दुकाने महिला बचत गटांना देणे ही काळाची गरज आहे. तसेच, ज्या रेशन दुकानांचे अनेक वर्षांपासून नूतनीकरण किंवा स्वतंत्र जाहीर प्रक्रिया करण्यात आलेली नाही, अशा सर्व दुकानांची चौकशी करून पात्र व गरजू महिला बचत गटांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रूपेश वलके हे सामाजिक कार्यकर्ता तसेच रास्त भाव दुकानदार संघटना, गडचिरोली चे सदस्य आणि कार्यकारी कार्याध्यक्ष आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos