महत्वाच्या बातम्या

 औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क


- रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष उपाययोजना; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात बुधवार, २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत मिळावा आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध
उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून नियोजित बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सातत्याने सुरू ठेवले आहे. तसेच बंदच्या काळात काही औषध दुकाने सुरू राहतील याची दक्षता घेण्याबाबत संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत औषधांची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो. ९०९६४१४१०४) तसेच सहायक आयुक्त (औषधे) नीरज लोहकरे (मो. ७२७६५४4९७२) यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत 
सिरोंचा – ९४२१७२९६७२
भामरागड – ९४०४४३८३८३
एटापल्ली – ९४२१८५६५१६
आलापल्ली – ९४२१७२९३८४
अहेरी – ९७६७८२०२२०
मुलचेरा – ९४२१८५४८१९
आष्टी – ९४२२१५१२९९
चामोर्शी – ९५८८६७८२४२
गडचिरोली – ९४२१७३५६२० / ९४२३४२२१३०
आरमोरी – ९४३८२०२१६ / ९४२०९७३६८०
वडसा –९४२२१५०६४० / ८९९९३६२८४४
कुरखेडा – ९४०४8३१३३२
कोर्ची – ९४२२१५४७६६ / ७७५७००५९४४
धानोरा – ७५८८७७२७४३

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सेवा घ्याव्यात, असे सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली नीरज लोहकरे यांनी म्हटले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos