फक्त ११ मिनिटे बलात्कार झाला म्हणत न्यायमूर्तींनी आरोपींची शिक्षा कमी केली : देशभरात निदर्शने


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / स्वित्झर्लंड :
स्वित्झर्लंडमधील एका निर्णयाने तिथली सजग मंडळी आश्चर्यचकीत झाली आहेत. एका न्यायमूर्तींनी बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींची शिक्षा कमी केली आहे. शिक्षा कमी करत असताना त्यांनी जे कारण दिले आहे ते कारण ऐकून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाचे मूळ बनले आहे. या निर्णयाच्या विरोधात निदर्शने सुरू झाली असून हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. पीडित महिलेवर 20 जून 2020 रोजी बलात्कार झाला होता. पीडित महिलेवर हल्ला करून तिला बंदी बनवत तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यातल्या एका आरोपीचं वय 17 वर्षे आहे तर दुसऱ्या आरोपीचं वय 32 वर्ष आहे.
न्यायमूर्तींनी या प्रकरणातील आरोपींची शिक्षा कमी करताना म्हटले की 'महिलेवर फक्त 11 मिनिटेच बलात्कार झाला आहे आणि हा वेळ बराच कमी आहे.' न्यायालयाने या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा सुनावलेली नाहीये, मात्र सज्ञान आरोपीला यापूर्वी न्यायालयाने 51 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या आरोपीने शिक्षेविरोधात दाद मागितली होती. यावर न्यायमूर्तींनी त्याची शिक्षा 51 महिन्यांवरून 36 महिने केली आहे. विशेश बाब ही आहे की न्यायमूर्ती या स्वत: महिला आहेत. न्यायमूर्तींनी आरोपीची शिक्षा कमी करत असताना आणखी काही विधाने केली आहे. त्यांनी म्हटले आहे की 'पीडितेने आरोपींना खाणाखुणा केल्या असाव्यात ज्यामुळे आरोपींची हिम्मत वाढली असावी.' न्यायमूर्ती म्हणाल्या की 'ही एक लहानशी चूक आहे.'
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-10Related Photos