स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अनुदानात महाराष्ट्र सरकारने केली वाढ
- खासदार रामदास तडस यांनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार.
- महाराष्ट्र केसरी स्पर्धे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना केली होती विनंती.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कुस्ती खेळाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजीत करण्यात येते. या स्पर्धेकरिता राज्य शासनाच्या माध्यमातुन प्रतिवर्ष रु. ५० लक्ष अनुदान देण्यात येत होते. या अनुदानामध्ये महाराष्ट्र शासनाने १५ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमीत करुन अनुदान रुपये ७५ लक्ष केल्याची माहिती खासदार तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषेदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले.
पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमा दरम्यान खासदार तडस यांनी अनुदान वाढवुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे मागणी करुन स्पर्धा दरवर्षी नियमीत आयोजीत करण्याबाबत विनंती केली होती. कुस्तीगीरांच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेली ही स्पर्धा अनुदान वाढेसह नव्याने आयोजीत होणार असल्याने कुस्तीगीरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निर्णयाबद्दल खासदार रामदास तडस यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या प्रति आभार व्यक्त करुन सरकारचे या निर्णयाचे स्वागत केले आहे.
News - Wardha