नारायण राणे यांना जामीन मंजूर : न्यायालयाने घातल्या 'या' अटी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रात्री उशिरा महाड न्यायालयाकडून  जामीन मंजूर झाला. त्यांची पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. महाड न्यायालयाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना जिल्ह्या पोलीस कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच कोणावर दबाव आणता येणार नाही. दरम्यान, राणे पहाटे मुंबईत पोहोचले. रात्री जामीन मिळाल्यानंतर ते रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पहाटे पाचच्या सुमाराला ते मुंबईत दाखल झाले आहेत.
तर दुसरीकडे भाजपची कोकणातली जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राणेंसह भाजप नेते मुंबईत परतले आहेत. 1-2 दिवसांत जनआशीर्वाद यात्रेचा निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे..
दरम्यान, राणे यांची जामीनावर सुटका झाली तरी त्यांना न्यायालयाने समज दिली आहे. राणे यांनी पुराव्यांशी छेडछाड करु नये, खटल्याशी संबंधित कोणालाही धमकावू नये. तसेच कोणावर दबाब आणू नये, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर 2021 रोजी हजेरी लावावी, तपासासाठी व्हाईस सँपल हवे असल्यास ते द्यावे, अशा अटी न्यायालयाने त्यांना घातल्या आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-25


Related Photos