मुंबई विमानतळावर मोठी कारवाई : २५ कोटींच्या अमली पदार्थासह दोन महिलांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
 विमानतळावर २५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून  या अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आईसह मुलीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. कतार एअरवेजच्या विमानाने या दोन महिला मुंबईत आल्या होत्या. त्यांनी बॅगेतून लपवून ५ किलो अमली पदार्थ आणले होते. मुंबई कस्टमने केलेली ही मोठी कारवाई आहे. 
मुंबईत कतार एअरवेजच्या विमानाने या दोघी मुंबईत येत असताना त्यांनी त्यांच्या बेगॅत सुमारे ५ किलो अमली पदार्थ लपवून आणले होते. मात्र कस्टम विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारी त्यांची चौकशी केल्यानंतर ही बाब पुढे आली. या महिलांच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता लपवून ठेवलेले सुमारे २५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. भारतात अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी या दोन महिलांना मोठी रक्कम मिळणार होती. या दोघी विदेशी नागरिक असुन त्यांना न्यायालयात हजार केले असता ५ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-09-22
Related Photos