महत्वाच्या बातम्या

 राजे लक्ष्मणसिंह भोसले कॉलेज ऑफ फार्मसी अकोला येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अकोला : जिल्ह्यातील कमी प्रमाणात होत चाललेला रक्तपुरवठा बघता सदर शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये २५ रक्तदात्यानी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. 

सदर कार्यक्रम इंदिराराजे भोसले संचालक भोसले एज्युकेशन ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयचे प्राचार्य प्रा. अक्षय जगताप, प्रा. अश्विनी इंगळे यांनी आयोजित केला. रक्तसंकलन करण्याचे काम जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील डॉ. सुनील जोशी व त्यांच्या चमुने केले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. सागर सिरसाट, प्रा.निखिल नाळे, प्रा. आशिष येवतकार, प्रा. तुषार मानकर, प्रा. विश्वजित थोरात, प्रा. मयुरी पहुरकार, प्रा. कल्याणी पोच्छी व इतर शिशकेत्तर कर्मचारी विषेश सहकार्य वंचित आघाडीचे पराग गवई, आंरभ अल्पसंख्याक संस्था यांनी केले.





  Print






News - Rajy




Related Photos