महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत भाजपा जिल्हा पदाधिकारी बैठकीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन


- माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे बैठकीत मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा पदाधिकारी बैठक आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी राजकीय नियोजन तसेच पक्ष विस्ताराच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसुचीत जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थितीत राहुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपा संघटना अधिक सक्षम, प्रभावी आणि जनसंपर्कात अग्रस्थानी ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

बैठकीदरम्यान SIR (एस.आय.आर.) तसेच पदवीधर मतदार संघ या महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित मान्यवरांनी सविस्तर चर्चा करून आगामी जबाबदाऱ्यांबाबत पदाधिकाऱ्यांना दिशा दिली. संघटन मजबूत करण्यासाठी नियोजन, कार्यपद्धती आणि बूथ स्तरावरील तयारीवर विशेष भर देण्यात आला.

यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी किर्तीकुमार ऊर्फ  (बंटीभाऊ) भांगडिया, गडचिरोली चे लोकप्रिय आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका योगिता पिपरे, डॉ. चंदाताई कोडवते, यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच प्रसंगी धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन सोहळ्यामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरण लाभले.

भाजपाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती देणारी आणि आगामी निवडणूक तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी ही बैठक उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos