गडचिरोली बॉक्सिंग संघ राज्य बॉक्सिंग स्पर्धेकरिता रवाना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : १ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२३ रोजी अकोला येथे होनाऱ्या शालेय राज्यस्तर बॉक्सिंग स्पर्धेकरिता गडचिरोली जिल्हयाचा बॉक्सिंग संघ राज्य बॉक्सिंग स्पर्धे करिता रवाना, नुकत्याच चंद्रपुर येथे पार पडलेल्या शलेय विभागिय बॉक्सिंग स्पर्धे मध्ये गडचिरोली प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू १४ वर्षे वयोगटात मुला मध्ये ३४ किलो वजनगटात अंश जगदिश घकाते, ४६ किलो वजनगटात आदर्श दुर्योधन नागतोडे, मूली मध्ये १७ वर्षे वयोगटात ४२ किलो खालील वजनगटात अदिती गीरितर बांते, ४६ किलो वजनगटात दिशा प्रभाकर लोनबले, ५२ किलो वजनगटात भैरवी नरेंद्र मरडकर मुला मध्ये १७ वर्षे वयोगटात ४० किलो वजनगटात रितेश गोपाल करंगामी या खेळाडूंचा समावेश आहे.
सर्व खेळाडू जिल्हा बॉक्सिंग कीडा प्रशिक्षण केंद्राचा नियमित प्रशिक्षणार्थी असून त्याना यशवंत कुरुडकर, पंकज मडावी, संतोष गैनवार, महेश निलेकार यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षन घेतात. यांच्या यशासाठी जिल्हा कीडा अधीकारी प्रशांत दोंदल, कीडा अधिकारी घटाळे, जिल्हा बॉक्सींग असोशिएशन चे जगदिश म्हस्के, सचिव यशवंत कुरुडकर, पंकज मढावी, रजत देशमुख, संतोष गैनवार, महेश निलेकार, निखील इंगळे, संजय मानकर, अनिल निकोडे व मीत्र परिवारानी पुढिल बाठचालीस सुभेच्छा दिले.
News - Gadchiroli