शक्ति वंदन पद यात्रेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : सौ.योगिता पिपरे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात रन फॉर नेशन, रन फॉर मोदी या उपक्रमांतर्गत शक्तीवंदन पद यात्रेचे आयोजन ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले आहे. या शक्तीवंदन पद यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री सौ. योगीता पिपरे यांनी केले आहे.
या यात्रेचे शुभारंभ खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजभे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेश भुरसे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिता हिंगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
News - Gadchiroli