चंद्रपूर : महावितरण तर्फे माता महाकाली भविकांना महाप्रसाद व शित जलाचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे, आज ५ एप्रिल २०२३ रोजी चंद्रपूर उपविभाग क्रमांक १ महावितरण चंद्रपूर व बाबुपेठ शाखा, बालाजी शाखा, समाधी शाखा, हॉस्पिटल शाखा येथे कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याद्वारा माता महाकालीच्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, उपविभाग क्रमांक १ चंद्रपूर व त्यांतर्गत शाखा कार्यालयाचे सहा. अभियंता सर्वश्री- साहिल टाके, सुमेध खणके, मिथुन मेश्राम, टिकेश राऊत, पराग हलमारे, रितेश ढवळे, प्रवीण शेंडे, अतुल रोडगे, राजश्री धोबे, सुचिता डवरे व मोठया संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाकाली यात्रेकरिता मोठया प्रमाणात नांदेड, बीड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया तसेच विदर्भातील इतर जिल्हयातील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून देवी महाकालीचे भक्त हजेरी दर्शनाला येत असतात. महाप्रसाद वितरणासाठी, विजय भैसारे, महेंद्र चहारे, प्रमोद रणदिवे, अनिल बनकर, अविनाश टेकूलवार, नितेश गाडगे, गमतीदास कुळमेथे, मोहन मरापे, अविनाश निमजे, तुकाराम शिंदे, शशांक चिवडें, रमेश टेकाम, चेतन बुरडकर, अशोक गुडमेडलावार, तसेच महिला कर्मचारी कांता मेश्राम, उषा नळे, निलिमा मेश्राम, शितल मेश्राम, मेघा मेश्राम उषा, हेलवडे नेहा, चौधरी रोहिणी ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या श्रीमती. संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता सुहास पडोळे इतर अधिकारी अभियंता व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
News - Chandrapur