भाजपा गडचिरोली शहर मंडळाची नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विश्वास, विकास व जनकल्याणकारी कारभाराची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर मंडळाची नियोजनात्मक बैठक उत्साहात पार पडली.
प्रदेशाध्यक्ष मा. आमदार रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली.बैठकीत आगामी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
बैठकीत जागतिक पर्यावरण दिन,आंतरराष्ट्रीय योग दिन,आपत्कालाच्या ५१ वर्षांच्या स्मृती,एक पेड़ माँ के नामवृक्षारोपण अभियान,मन की बात कार्यक्रम,पदवीधर मतदार नोंदणी,घर चलो अभियान,स्वच्छता मोहीम, प्लास्टिक निर्मूलन तसेच प्रत्येक प्रभागात जनजागृती शिबिरे आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाशजी गेडाम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष (माजी नगराध्यक्ष)तथा नगरसेविका योगिताताई पिपरे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,भाजपा प्रदेश सदस्य डॉ. चंदाताई कोडवते, महिला आघाडी शहराध्यक्ष सीमा कन्नमवार,शहर महामंत्री विनोद देवोजवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




