महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीत ६०KW चं EV चार्जिंग स्टेशन सुरू : पर्यावरणपूरक प्रवासाला चालना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही शहराच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकत आदित्य सर्वो इंडियन ऑइल पंप येथे ६०KW क्षमतेचं अत्याधुनिक EV e-Charge स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या FAME India योजनेअंतर्गत हे स्टेशन उभारण्यात आलं आहे.

उद्घाटनाच्या प्रसंगी इंडियन ऑइल  आदित्य सर्वो सिंदेवाही पंपाचे डायरेक्टर गणेश भाऊ गोलपल्लीवार, लोड्डेल्लीवार सर, माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, स्वामी गोलपल्लीवार इतर मान्यवर व पंप व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने पूजा करून स्टेशनचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

६०KW DC फास्ट चार्जर असल्याने आता इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी ३० ते ४० मिनिटांत ८०% पर्यंत चार्ज करता येणार आहेत. यामुळे सिंदेवाही आणि परिसरातील EV चालकांना आता लांबच्या प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

इंडियन ऑइल कंपनीने पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांसाठीही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos