चंद्रपूर एलसीबीची धडक कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणी दोघांना अटक

- ५० हजारांची दुचाकी जप्त, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३९४/२५ अंतर्गत कलम ३०३(२) बीएनएसनुसार मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
या कारवाईत आरोपी उशांत देवराव कार्लेकर (वय ३६), रा. तुकूम, चंद्रपूर व प्रवीण नानाजी पिंगे (वय ३६), रा. नेहरू नगर, चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एमएच ३४ बीएन ५४४२ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा पोउपनि सर्वेश बेलसरे, एएसआय धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, पोहवा चेतन गज्जलवार, पोलीस अंमलदार सुमित बरडे व अजित शेंडे यांच्या पथकाने केली.
News - Chandrapur




Petrol Price




