महत्वाच्या बातम्या

 भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका : १३८ बेटिंग ॲप्स आणि ९४ लोन ॲप्सवर बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारत सरकारने चीनी कनेक्शन असलेल्या लोन आणि बेटिंग ॲप्सवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या ॲप्सवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने बंदी घातलेल्या ॲप्समध्ये १३८ बेटिंग ॲप्स आणि ९४ लोन ॲप्स आहेत. या ॲप्समुळे भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका होता.

या ॲप्सचा चीनशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, या ॲप्सना आपत्कालीन आणि तातडीने ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूण २३२ ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आयटी कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याची माहिती दिली होती. त्यानंतर या ॲप्सवर कारवाई करण्यात आली.

थर्ट पार्टी वेबसाइटवर उपलब्ध

स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी बहुतेक ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत, पण थर्ड पार्टी लिंक किंवा वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. अनेक ॲप्स थेट सोशल मीडिया साइटवरून ऑनलाइन देखील प्ले केले जाऊ शकतात. यापैकी अनेक ॲप्स क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट स्वीकारतात.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयने म्हटले की, भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहे. याची जाहिरात करण्यावरही ग्राहक संरक्षण कायदा २०१९, केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायदा १९९५ आणि आयटी नियम २०२१ अंतर्गत बंदी आहे. मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरात कंपन्यांनाही भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिराती न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक लोकांची आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.





Facebook    Twitter      
  Print






News - Rajy | Posted : 2023-02-05




Related Photos