मुदतीत शाळेची वस्तुनिष्ठ माहिती ऑनलाइन युडायस प्लसमध्ये भरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : युडास प्लस प्रपत्रामध्ये दिलेल्या मुदतीत शाळेची वस्तुनिष्ठ माहिती ऑनलाइन युडायस प्लसमध्ये भरावी अशी सूचना देसाईगंज येथील गटसंसाधन केंद्रात १ नोव्हेंबर रोजी आयोजित आमगाव व विसोरा केंद्रातील मुख्याध्यापक कार्यशाळेला मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी दिली.
सन २०१८-१९ या वर्षापासून राज्यातील सर्व शाळांची माहिती संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अंतिम झालेली माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामार्फत प्रमाणित करून राज्याची माहिती भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यामधील सर्व शाळांकडून शाळा तपशील, विद्यार्थी संख्या, दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, शाळा अनुदान, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण आदी माहिती संकलित करण्यात येते. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या अंमलबजावणीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळाप्रमुख म्हणून काटेकोर व वस्तुनिष्ठ माहिती सदर प्रपत्रात ऑनलाइन भरावी, असे मार्गदर्शन केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी केले. कार्यशाळेला गटसमन्वयक संजय कसबे, आमगाव व विसोरा केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद गुरनुले, विषयसाधन व्यक्ती अरविंद घुटके, जितेंद्र पटले, रामकृष्ण रहांगडाले, राणू ठाकूर, होमा सहारे विषयतज्ज्ञ अल्का सोनेकर, वैशाली खोब्रागडे, खाजगी शाळेचे मुख्याध्यापक भोजराज ठाकरे, ज्ञानेश्वर लाडे, विष्णू दुनेदार, नीलेश तित्तीरमारे, मुख्याध्यापिका चंदा कुळमेथे, आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli