नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी विधानसभेत प्रश्न उचलणार : आ. डॉ. देवराव होळी


- अमिर्झा येथील वाघाच्या हल्ल्यातील मृतक सौ. खाडे यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट
- मृतकाच्या परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यात वाघाचे होणारे हल्ले व त्यातील मृत पावलेल्या परिवारांची परिस्थिती लक्षात घेता वाघाच्या बंदोबस्तासाठी आपण सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करीत असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण हा मुद्दा उचलून धरला असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी अमिर्झा येथील वाघाच्या हल्ल्यातील मृतक खाडे यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट घेतली असता दिली.
मौजा अमिर्झा तालुका गडचिरोली येथील खाडे परिवारातील ३५ वर्षीय निष्पाप महिलेचा वाघाच्या हल्ल्यात नाहक जीव गेला. या खाडे परिवारातील सदस्यांची आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी सांत्वन पर भेट घेतली व त्यांना आर्थिक मदतही केली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, अमिर्झाच्या सरपंच सौ सोनालीताई नागापुरे, पंचायत समितीचे माजी सदस्य भाजप नेते डॉक्टर प्रमोद धारणे, सुधाकर बाबनवाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप नागापुरे, भाजपाचे नेते बूथ प्रमुख सुनील आयतुलवार, कोतपल्लीवार यांचे सह भाजपा पदाधिकारी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Gadchiroli