महत्वाच्या बातम्या

 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना स्पर्धा परीक्षार्थींचे निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  बल्लारपूर : विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बल्लारपूर शहरात आगमन झाले. असता, आम आदमी पक्षाचे युथ सचिव तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्पर्धा परिक्षांच्या संदर्भातील विविध समस्यांवर आक्रमक भुमिका घेण्यासंदर्भात निवेदन दिले. 

यावेळी, तलाठी भरती, वनरक्षक भरती सारख्या प्रलंबित भरती तसेच २०१९ मध्ये जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषद भरती व पशुसंवर्धन भरती रद्द झाल्यावर सुद्धा त्याची परत न मिळालेली फी, अशा अनेक प्रश्नांवर सरकारकडे जाब विचारण्या संदर्भातील विनंती केले आहे.

यावेळी, सीवायएसएस सह प्रमुख आशिष गेडाम, युथ अध्यक्ष सागर कांमळे, सीवायएसएस अध्यक्ष शिरीन सिद्दीकी, देसी फिटनेस ग्रुपचे सागर पिंपरे, सुदेश शिंगाडे, स्वयम अलोने तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते. 

Facebook    Twitter      
  Print


News - Chandrapur | Posted : 2023-02-15
Related Photos