महत्वाच्या बातम्या

 विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार


- मृद्गंध पुरस्कारांचे वितरण

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शाहिर विठ्ठल उमपयांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही. असे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १२ व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोपाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार २०२२ चे वितरण करतांना ते बोलत होते.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात फ.मुं. शिंदे, रवींद्र साठे, डॉ. रवींद्र कोल्हे, स्मीता कोल्हे, संजय मोने, सुकन्या मोने, कमल शिंदे, श्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पदमभूषण उस्ताद राशीद खॉं, आशीष शेलार, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आज ज्यांना मृद्गंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तीरस्कारालाही तोंड द्यावे लागते मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.

यावेळी प्रत्येक सत्कारमूर्तीने आपले मनोगत व्यक्त केले. आमदार आशीष शेलार यांचेही यावेळी भाषण झाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos