महत्वाच्या बातम्या

 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : आमदार विनोद अग्रवाल यांची मागणी


- चाबी संघटनेच्या वतीने दिले निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : मागील काही दिवसापासून सातत्याने नियमित वादळ वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात होणाऱ्या भात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. पिकावर आलेला फुलोरा नष्ट होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे जनता की पार्टी चाबी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. 

प्रशासकीय इमारत गोंदिया येथे चाबी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील व तहसीलदार समशेर पठाण यांच्याशी सखोल चर्चा करत वादळ वाऱ्यामुळे घनाचे उभे पीक नाचले असून काही ठिकाणी पिकावर आलेला फुलोरा झडल्याने धान पिकाचे नुकसान झालेले आहे. शिवाय नदीकाठील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळभाजी व पालेभाजीचे उत्पादन घेतात. त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करताना धान व्यतिरिक्त इतर पिकांचे सुद्धा पंचनामे करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी कृषी विभाग व सर्व तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले जाईल व ताबडतोब शासनाकडे प्रस्ताव सादर केले जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी आमदार विनोद अग्रवाल, चाबी संघटनेचे अध्यक्ष भाऊराव ऊके, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, छत्रपाल तुरकर, जिल्हा परिषदेचे चाबी संघटनेचे गटनेता आनंदा वाढीवा, चेतन बहेकार, सुरेश लिल्हारे, विक्की बघेले, खेमेंद्र पंधरे, अजित टेंभरे, सुर्यमनी रामटेके, रमण लिल्हारे, टिकाराम नागपुरे व चाबी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos