स्कूल बसला दिली कारने धडक : तीन जण गंभीर तर नऊ विद्यार्थी जखमी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : स्कुल बसला कारची धडक होऊन तिन गंभीर तर नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज २३ नोव्हेंबर ला ३.३० वाजता वडसा जवळ घडली. वडसा कडून विद्यार्थी घेऊन येणारी स्किड्स होम येथील स्कूल बस कुरुड येथील मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना आरमोरी कडून येणाऱ्या कारने धडक दिली. त्या दुर्घटनेमध्ये तिन गंभीर तर कुरुड येथील दहा ते बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामधील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आणि स्कूलबसच्या ड्रायव्हरचा एक पाय हाथ निकामी झाला आहे. अधीक तपास वडसा पोलीस करीत आहेत.
News - Gadchiroli