गोंदिया शहरातील दोन प्रमुख रस्त्यांचे काम महिनाभरात सुरू होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील लघु पाटबंधारे कार्यालय ते मोक्षधाम पर्यंतचा सिमेंट रस्ता व वाजपेई चौक ते पिंडकेपार मंदिर या रस्त्याच्या बांधकामाला (डांबरीकरण) अनेक दिवसांपासून मंजुरी मिळाली होती.
परंतु त्याची निविदा प्रक्रिया बराच काळ रखडल्याने आणि रस्त्याचे बांधकाम एन झाल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचण होत होती. बर्याच काळापासून नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत असून जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया न.प. चे मुख्याधिकारी करणकुमार चौहान यांना पत्र लिहून निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून डिसेंबर महिन्यात काम सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यावर गोंदिया न.प.चे मुख्याधिकारी यांनी सकारात्मक कार्यवाही करून तातडीने निविदा काढण्याचे आदेश दिले व १ महिन्याच्या आत काम सुरू होईल असे आश्वासन दिले.
News - Gondia