अहेरी येथील तलाठी आणि आर.आय अडकले एसीबीच्या जाळ्यात
- माहिती देण्यास एसीबीच्या टाळाटाळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील महागाव येथील तलाठी वेंकटेश जेल्लेवार आणि आर.आय. केवळ ९ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याच्या आरोपात आज दुपारी एसीबीच्या जाळ्यात अडकले असून याबाबत गडचिरोली येथील एसीबीला संपर्क साधले असता सदर घटनेला दुजोरा दिले मात्र माहिती देण्यास टाळाटाळ केले.
सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी कडून फेरफार करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्यासंदर्भात आज एसीबीने तलाठी आणि आर.आय. ला अटक केले. असल्याची घटना अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली असून सध्या अहेरी पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .
News - Gadchiroli