धान कापत असतांना अचानक वाघाचे आगमन : नवरगांव येथील शिवटेकडी परिसरातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : वन परिक्षेञातील उपक्षेञ नवरगांव अर्तगत रत्नापूर बिटातील शिवटेकडी परिसरातील हुमनलनी लगत शंकर आंबोरकर नवरगांव यांच्या शेतात धान कापण्यासाठी सोमवारला सकाळी १० महीला गेल्या धान कापत असतांना अचानक पट्टेदार वाघाने महीलांच्या जवळपास येऊन आरोळी देताच महीलांची तारांबळ उडाली. कुणाला काहीच सुचेना परंतु आपला जीव वाचविण्यासाठी महीला सैरावैरा पळाल्या. दहा पैकी ६ महीला कशाबशा चार किमी अंतर कापुन नवरगांवला पोहचल्या तर दोन महीला तिकडेच गायब झाल्याने त्यांना वाघाने मारल्याची वार्ता गावात येऊन सांगीतली. काहींनी वन विभागालाही कळविले. शेवटी त्या महीलांना शोधण्यासाठी क्षेञसहाय्यक एस.बि. उसेंडी, वनरक्षक जे. एस. वैद्य व नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि शोधाशोध करीत असतांना सदर दोन महीला शेतातील धान पिकातुन स्वताचा जिव वाचविण्यासाठी पळतपळत काही अंतर कापुण शेतशिवारामध्ये सुखरुप आढळल्याने वनविभागाने व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. बराच वेळ त्या पट्टेदार वाघाला हाकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र धान कापणी करायची असल्याने घाबरलेल्या महीलांची हिम्मतच होईना. शेवटी बरेच नागरीक शेतावर उभे राहीले आणि वाघाच्या दहशतीत धानाची कापणी करण्यात आली. या परिसरात धानाची शेती भरपूर असल्याने व धान कापणीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
News - Chandrapur