अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार : वैरागड, मानापुर मार्गावरील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : काल १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना वैरागड, मानापुर मार्गावर वैरागड जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार वैरागड, मानापुर मार्गावरील वैरागड जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळ गाठले. व बिबट्याचे शव आपल्या ताब्यात घेतले, अधिक तपास वनविभाग करीत आहे..
News - Gadchiroli




Petrol Price




