माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील मनेराजाराम येथील जय गोंडवाना कबड्डी क्लब मंनेराजाराम यांच्या वतीने भव्य अ गट व ब गट असे ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय ककंडालवार यांच्याहस्ते करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेसाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अधक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय ककंडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनेराजाराम चे सरपंचा शारदा कोरेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मलेश तलांडे सरपंच मडवेली, संजय येजूलवार उपसरपंच ग्रा.प.येचली, मनीषा मडावी उपसरपंच ग्रा.प.मनेराजाराम, परमेश मडावी उपसरपंच मडवेली, चिंनु सडमेक, प्रभाकर मडावी, गणेश नागापुरे, श्रीनिवास कुंदावार, सीताराम पेंदाम, प्रभाकर सडमेक, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, नरेश गर्गम, राकेश सडमेक, सोमजी पेंदाम, अजित पेंदाम, आशिष सडमेक, सचिन सडमेक, साईनाथ पेंदाम, करण पेंदाम, महेश पेंदाम, अविनाश पेंदाम, आशिष मडावी, रवींद्र सडमेक, नकुल आलम, अजय सिडम तसेच परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक अ गट साठी २१ हजार १ % व ब गट साठी २१ हजार १ % हजार देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक अजय कंकडालवार यांचे कडून अ गट ला १५ हजार १ % तसेच द्वितीय पारितोषिक बि.एल.मडावी यांचे कडून ब गट ला १५ हजार १ % देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक रुद्राक्ष रवी पेंदाम यांचे कडून अ गट यांच्या तर्फे १० हजार १ % तसेच तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत कार्यालय मनेराजाराम यांचे कडून ब गट ला १० हजार १ % असे तीन तीन अ गट आणि ब गट ला पारितोषिक देण्यात येत आहे.
या कबड्डी स्पर्धेसाठी परिसरातील विविध गावांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला आहे. मंडळचे अध्यक्ष : प्रवीण पेंदाम, उपाध्यक्ष : सोनू सडमेक, सचिव : आर्यन सडमेक, कोषाध्यक्ष : संतोष मडावी, क्रीडाप्रमुख : राहुल पेंदामसह आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli