महत्वाच्या बातम्या

 औद्योगिक शांतता ठेवण्यासाठी कामगारांचे प्रश्न प्राथमिकतेने सुटावे : आ. किशोर जोरगेवार


- विविध कामगार संघटनांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर हा वीज उत्पादक जिल्हा आहे. परिणामी वीज कामगारांची संख्या येथे अधिक आहे. मात्र कामगारांच्या अनेक मागण्या आजवर सुटु शकलेल्या नाही. राज्याला उजेळात ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या आपण प्राथमिकतेने सोडविल्या पाहिजे. औद्योगिक शांती राखण्यासाठीही हे गरजेचे असल्याचे आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटले असून कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

विविध विज कामगार संघटनांच्या नेत्यांना घेऊन आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील देवगीरी बंगल्यावर उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी ऊर्जामंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरातील वीज कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. नुकतीच त्यांनी वीज कामगारांची सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांसह बैठक घडवून आणली होती. या बैठकीत कामगारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यातील काही समस्या सुटल्या आहेत. मात्र शासनपातळीवरील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी वीज कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी कामगारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असुन सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडे न जाता ते सरळ कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. दरवर्षी कामगारांचे  प्रोग्रेस रिर्पोट ही तयार करण्यात यावा असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

चंद्रपूरात महाऔष्णिक विद्युत केंद्रात जवळपास ४ हजार वीज कामगार काम करत आहेत. ईतर ही खाजगी विद्युत केंद्रात कामगारांची संख्या मोठी आहे. अत्यंत जोखमीचे काम ते करत असतांना त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले. याबाबत उच्च अधिकाऱ्यांसोबत कामगार संघटनांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सर्व मागण्या आपण समजून घेतल्या आहे. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी कामगार संघटना आणि उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos