जिल्ह्यातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित : जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी
- नगर परिषदेचा अभिनव उपक्रम
- आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य प्रदर्शनी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महिलांनी न घाबरता, निर्भय होऊन विविध क्षेत्रात समोर जाणे गरजेचे आहे. त्याकरिता आवश्यकता पडल्यास पोलीस विभाग तत्पर राहील. स्पर्धेच्या युगात वावरत असतांना महिला व युवतींनी चांगल्या गोष्टींची स्पर्धा करावी. मात्र त्यापासून स्वतः ला किंवा दुसऱ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांकडे दुष्ट नजरेने पाहणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी पोलीस विभागाच्या ११२ हेल्पलाईनवर संपर्क करावा. तात्काळ संपर्क केलेल्या महिलेला मदत मिळून त्या सुरक्षीत राहतील. सुरक्षीत महिला हेच पोलीस विभागाचे ध्येय आहे. जिल्ह्यातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित राहील असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी केले.
संताजी मंगल कार्यालयात आयोजित नगर परिषद भंडारा, महिला व बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पालिका प्रभारी उपाआयुक्त संघमित्रा ढोके होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, मार्ल्यापण करून व व्दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा नगर परिषदचे मुख्याधिकारी विनोद जाधव जिल्हाधिकारी कार्यालय नगर परिषद पालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त चंदन पाटील, उपमुख्याधिकारी अश्विनी चव्हाण, जाधव, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कल्पना शिरपूरकर, प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे, शहर स्तर संघ अध्यक्षा रंजना साखरकर, नगर परिषदेच्या समूह संघटिका रेखा आगलावे, उषा लांजेवार उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित तृणधान्या पासून तयार केलेले पाककला प्रदर्शनीचे उद्घाटन व अवलोकन करण्यात आले होते. त्यामध्ये महिला बचत गटांतर्गत तृणधान्य पदार्थ चे १८ स्टोल लावले असून त्यात भगरची खीर, ईडली, उत्तपम, राजगिरयाचे लाडू, हलवा, ज्वारीची चकली व आंबील, झुणका भाकर, भाकरीचा चुरमा, इडली, नाचणीचे ढोकळा, हलवा, सूप, केक व इतर पौष्टीक तृणधान्याचे पदार्थाचे स्टॉल होते.
मान्यवरांचे स्वागत ढोल ताशा, लेझीमच्या गजरात व स्वागत गीत तसेच शाल श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विनोद जाधव नगर परिषदेच्या विविध योजनेच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून महिलांची मोठी फळी तयार केली असल्याचे सांगितले. महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या नावाबरोबरच जिल्ह्याचे नाव लौकिक करावे.
महिलांनी समानतेच्या दृष्टीकोनातून स्वविकास करून घ्यावा, असे प्रतिपादन नगर पालिका नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय प्रभारी उपाआयुक्त संघमित्रा ढोके यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रिडा क्षेत्रात उतुंग भरारी, गुणवंत विद्यार्थिनी, प्रशासकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार तसेच स्त्रीशक्तीचा गजर, जागर, अभिव्यक्ती व मार्गदर्शन तसेच महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांनी फॅशन शो मध्ये भारतातील थोर महिंला समाज सुधारक यांचे हुबेहूब वेशभूषा धारण करून त्यांचे जीवन चरित्र कार्यावर प्रकाश टाकला त्यामध्ये सावित्रीबाई, मा जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मिबाइ, सिंधीताई सपकाळ, मदर टेरेषा, माता रमाई इंदिरा गांधी, किरण बेदी, पी.टी, उषा, कल्पना चावला, अहिल्याबाई होळकर, आनंदी बाई जोशी, यांचे पात्र साकार केले. होम मिनिस्टर, रेड मॅचिंग, रांगोळी स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात व्यक्तिगत, समुह नृत्यांच्या माध्यमातून रसिकांची मने जिंकली.
यावेळी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असून त्यात थाईराइड, हिमोग्लोबिन शुगर, बिपी इ तपासणी करण्यात आली. व प्रास्ताविक नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या नियमानुसार वस्ती पातळीवर बचत गटांचे व्यापक जाळे तयार झाले असून बचत गटांच्या वस्तीस्तर संघटना व शहरस्तर संघटना तयार करून शासकीय योजना व अर्थसहाय्याच्या माध्यमातून महिलांचा स्तर उंचावण्याचे काम सुरू असल्याचे प्रविण पडोळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली नागुलवार यांनी तर आभार नंदा कावळे मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रकाश बांते, गुरुदास शेंडे, विलास रामटेक लिपिका गणवीर, शहर स्तर संघाचे पदाधिकारी समिता भंडारी, साहिना खान, प्रियंका सेलोकर, सीमा साखरकर, सुनंदा कुंभलकर, रंजना गौरी, नुतन कुरंजेकर, ज्योती राऊत, बेबी वाडीभस्मे, राजश्री गोस्वामी, सूर्यकांता वाडीभस्मे, कोमल बारापात्रे, सुनिता बावनकर, माधुरी खोब्रागडे, सारिका रामटेके, गीता नागपुरे, मुक्ता बोरकर, कोमल सोनटक्के, अंकिता साखरकर, भावना बोरकर, सुरेखा शेंडे, भावना शेंडे, दक्षता लांजेवार, कुंदा बोरकर व शहरातील बचत गटातील सर्व महिलांनी सहकार्य केले.
News - Bhandara