नागपूरच्या आईस फॅक्टरीत अमोनियाच्या टाकीचा स्फोट : स्फोटात एका कामगाराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर येथील बर्फ कारखान्याच्या अमोनियाच्या टाकीत भीषण स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या ७० वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन कर्मचारी जखमी झाले आहे.
ही घटना उप्पलवाडी परिसरात शनिवारी रात्री उशिरा बालाजी आईस फॅक्टरीत अचानक मोठा स्फोट झाला.
माहितीनुसार, स्फोटाचा आवाज ऐकून कारखान्यात गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी कामगार इकडे धावू लागले. याची माहिती तात्काळ कपिल नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. मदत कर्मचारीही तेथे पोहोचले. ७० वर्षीय कामगार डुंगर सिंग रावत यांचा स्फोटामुळे मृत्यू झाला. तसेच ५५ वर्षीय सावन बघेल, खेमू सिंग आणि नयन आर्य हे गंभीर जखमी झाले आहे.
त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले. तिघांवरही उपचार सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा स्फोट झाला तेव्हा चार कामगार अमोनियाच्या टाकीजवळ साफसफाई करत होते. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या वाहनांनाही त्याचा फटका बसला. स्फोटामुळे वाहनांच्या काचाही फुटल्या.
मृत डुंगर सिंग रावत हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारखान्यात तो बराच काळ काम करत होता. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. अमोनियाच्या टाकीचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.
News - Nagpur