महत्वाच्या बातम्या

 भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रॅक्टरला दिली धडक : ट्रॅक्टरचे झाले ४ तुकडे सुदैवानी जीवितहानी नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : मुख्यालयापासून अंदाजे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपरखारी नजीक १९ तारखेला संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान आलेवाडा येथून मुरारी कुंजाम राहणार बेतकाठी येथील शेतकरी स्वतःच्या मालकीचे धान्य भरून येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टर ही चार तुकड्यात विभाजली गेली. सदर ट्रॅक्टर मध्ये ५ लोक बसून होते त्यात दोन चिमुकल्यांच्या सुद्धा समावेश होता. परंतु सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. ट्रॅक्टर मध्ये असलेल्या राकेश नैताम बेतकाठी यांना छातीला व पायामध्ये दुखापत झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर ट्रॅक्टर ही आलेवाडा येथील चैनसिंग कोराम यांच्या मालकीची असून समोरून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. सदर कार चालक हे पोलीस विभागात कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos