आलापल्ली येथील विविध धार्मिक उपक्रमाला मंत्री धर्मराव बाबा आत्राम व माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्य आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार २२ जानेवारी रोजी येथील मंदिरात अभिषेक पूजा व सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
तत्पूर्वी राम भक्तांनी सिरोंचा रस्त्यावरील पुलाजवाळून भव्य रॅली काढली. त्या रॅलीत मंत्री धर्मराव बाबा आत्राम, कन्या भाग्यश्री आत्राम आणि सुपुत्र हर्षवर्धन बाबा आत्राम सामील झाले. रॅली श्रीराम मंदिरात आल्यावर त्यांनी अभिषेक पूजा व सामूहिक आरती झाल्यावर मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघितले.
यावेळी कमिटी तर्फे त्यांचे शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी कमिटी चे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli