संविधान दिनाचे औचित्य साधून सुवर्ण महोत्सवाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /आष्टी : २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून सुवर्ण महोत्सवाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक तथा विद्यार्थी यांना महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र खराती यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकाचे प्रतिनिधी म्हणून साखरदास कोवे, विद्यार्थी सात्विक शेडमाके, सुजल शेडमाके, प्रियांशू कोवे, कुणाल तलांडे, श्रद्धा गेडाम, संध्या मादेस्वार, संजना नैताम, शिवम आलाम, आदी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक के.जी. बैस, शिक्षक व्यंकरमण पोलोजी, संगीता कोडमलवार, पुंडलिक कविराजवार, अनिल पिसे, अंकलेशकुमार रोहनकर, पायल दोशेटवार, राजेशम अंबिलप्पू, विनोद भूरसे मान्तेशकुमार रत्नावार, शिक्षकेतर कर्मचारी लिपीक राजेश्वर बर्लावार, शिपाई लक्ष्मण दूरशेट्टी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli