विकास कामांना गतिमान करा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश


- अहेरी तहसील कार्यालयात आढावा बैठक
- अखेर अहेरीतील बहुचर्चित रस्ता रुंदीकरणाचे मार्ग मार्गी लागणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / अहेरी : विकास कामांना गतिमान करा असे निर्देश आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार ५ मे रोजी अहेरी तहसील कार्यालयात विकास कामांच्या आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर तहसीलदार बालाजी सोमवंशी, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, एटापलीचे उपविभागीय अधिकारी (महसूल) व अहेरीचे प्रभारी अमर राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे नायब तहसीलदार नानाजी दाते, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, इरफान पठाण आदी मान्यवर होते.
आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, कृषी, सिंचन , घरकुल, शिक्षण, रस्ते, वीज, आरोग्य आदी विषयांवर अधिक भर देऊन गोर गरिबांच्या घरकुलासाठी कुठल्याही अडचणी येऊ न देता घरकुल पूर्णत्वास नेऊन गरिबांचे घरकुलाचे स्वप्न साकार करावे यात दुर्लक्ष व हयगय झाल्यास खपवून घेतले जाणार नाही असे सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना खडसावले.
उल्लेखनीय व विशेष म्हणजे अहेरी येथील मुख्य रस्त्याचे अतिक्रमण हटविण्यासाठी व रस्ता रुंदीकरणासाठी ताबडतोब सीमांकन करण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी निर्देशित केले. त्यामुळे आता लवकरच मागील अनेक वर्षांपासून अहेरीतील बहुचर्चित रस्ता रुंदीकरणाचा विषय मार्गी लागणार असल्याचे संकेत दिसत आहे.
आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षाचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, बालाजी गावडे, किशोर करमे, ताजू कुळमेथे, मुन्ना पठाण, संदीप ढोलगे आदी व विविध शासकीय विभागातील अधिकारी, शाखा प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
शेतीसाठी पांदण रस्ते ताबडतोब बनवा -
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत शेतीसाठी पांदण रस्ते ताबडतोब बनविण्यात यावे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या सोयी व हितासाठी पांदण रस्ते बनविण्यात यावे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पांदण रस्त्यासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
पांदण रस्त्यामुळे पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अडचण राहणार नसून शेतीमालासाठी वाहतूक सुलभ होणार तसेच शेतकऱ्यांचे काटकसर, परिश्रम, वेळ व खर्चाची बचत होणार असल्याचे आणि पांदण रस्ता शेतकऱ्यांसाठी फलदायी असल्याचे आवर्जून उल्लेख करून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी आनंद व्यक्त केले.
News - Gadchiroli




Petrol Price




