जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून इष्टाम कुटूंबाचे सांत्वन व आर्थिक मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी बंट्टी इष्टाम याची अत्यंत गरीब परिस्थिती व आई-वडील वारले, अशा परिस्थितीत त्यांची आत्या पालनपोषण करून मोठे केले.
मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने हमालीच्या कामे करत होता. अशातच तेलंगाणा राज्यातील शिरपूर येथे आलापल्लीच्या एका मालकांच्या गाडीवर सामान आणायला गेला असता गाडी पलटी होऊन सदर युवक बंटी इष्टामाच्या निधन झाले, असून काल आविंसचे विदर्भ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आलापल्ली येथे इष्टाम कुटूंबियांची भेट घेवून सांत्वन केले. तसेच त्यांना आर्थिक मदत केले.
- जनतेच्या सुख दुःखात सदैव तत्पर असणारे नेते म्हणजे अजय कंकडालवार
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, सचिन रंगोनवार, सागर, मनोज सडमेक, ईस्टाम, विनोद रामटेके, आविस व अजय मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.
News - Gadchiroli