महत्वाच्या बातम्या

 समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोलीपर्यंत होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदियापर्यंत केला जाणार आहे.

नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीलासुद्धा जाणार आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून, याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्य गुरुवारी येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिवंगत मनोहर पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाले. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. यावेळी मंचावर लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, जेएसडब्ल्यू समूहाचे चेअरमन सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, मनोग्राॅफचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप शाह उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, मनोहरभाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. ज्यावेळी केवळ सहा ते दहा टक्के लोक साक्षर होते. त्या काळात एकाच वेळी २२ शाळा व दोन महाविद्यालये सुरू करून त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच एक संपूर्ण पिढी शिक्षित झाली असल्याचे ते म्हणाले. 

माजी आमदार राजेंद्र जैन व आशावरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर  खा. पटेल यांनी प्रास्ताविक केले.





  Print






News - Gondia




Related Photos