भाजपा - राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस पक्षात प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील तांबडा येथील राष्ट्रवादी आणि भाजपाचे युवा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्या राष्ट्रवादी - भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी काँग्रेस नेते आविस तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, काँग्रेस नेते तालुका सचिव प्रज्वल नागुलवार, काँग्रेस नेते नगर सेवक निजाम पेंदाम, नगर सेवक नामदेव हिचामी, पो.पा.अजय गावडे, ग्राप सदस्य रमेश वैरागडे, माजी सरपंच अशोक येलमुले, कृ.ऊ. बा.स. संचालक अनिल करमरकर व आवीस काँग्रेस नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष प्रवेश केलेले नवनिर्वाचित कार्यकर्ते लालाजी हिचामी भाजप, दासरू मट्टामी रा.का., साधू मट्टामी, बाबुराव मट्टामी, कपिल मट्टामी, आकाश मट्टामी,अजय मट्टामी, शिवाजी मट्टामी, घ्यानेश मट्टामी,सुधाकर मट्टामी, नागेश हिचामी, राहुल मेश्राम, रवि रापांजी, आश्विन रापांजी, अरविंद गोटा, भावजी मट्टामी, रामजी बारसा, सुरेश धुरवा, राकेश लेकामी, बबन लेकामि, विलास पुंगाटी, राकेश लेकामि, बुधा लेकामि, रमेश पुंगाटी, रघुनाथ रापंजी, कपिल लेकामी, शामराव गोटा, कोटला मट्टामी सह तांबडा येथील शेकडो युवक काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
News - Gadchiroli