महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरावर मुलचेराचे नावलौकिक करा : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम


- तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : विध्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडा कौशल्यांना वाव मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी बाल कला व क्रीडा संमेलनाचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत तालुका स्तरावर मजल मारली आहे. आता जिल्हा स्तरावरही मुलचेराचे नावलौकिक करा असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.

जि.प. उच्च प्राथमिक शाळा, कोपरअली येथे बुधवार ३१ जानेवारी रोजी आयोजित मुलचेरा तालुक्याचे तालुका स्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार चेतन पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एल.बी. जुवारे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, पंचायत समितीचे माजी उप सभापती प्रगती बंडावार, कोठारीचे सरपंच मनोज बंडावार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम, केंद्रप्रमुख महेश मुक्कावार, सत्यनारायण कोमरेवार, भाऊराव निखाडे, देवनाथ बोबाटे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना मुलचेरा हा छोटासा तालुका असले तरी तालुक्यात मराठी आणि बांगला असे दोन माध्यमाची शाळा आहेत.येथील विध्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण दडले आहे. क्रीडा क्षेत्रात मुलचेरा तालुक्याचे विध्यार्थी नेहमीच पुढे राहिलेले आहेत. याही वेळेस उत्तम अशी चमू जिल्हा स्तरावर जाऊन यश संपादन करेल अशी, आशा त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार चेतन पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिले.

दरम्यान भाग्यश्री आत्राम यांचे आगमन होताच विध्यार्थी आणि शिक्षकांनी जल्लोषात स्वागत केले. कोपरअली, मथुरानगर, विजयनगर, लक्ष्मीपूर, लगाम, विवेकानंदपूर आणि शांतीग्राम आदी शाळेतील विध्यार्थ्यांनी झांकी द्वारे सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. दोन दिवस चालणाऱ्या तालुका स्तरीय बाल कला व क्रीडा स्पर्धेत स्पर्धेत गांधीनगर, लगाम, सुंदरनगर आणि मुलचेरा चार केंद्रातील जवळपास ३०० विध्यार्थी आपले क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos