अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तातडीने निलंबित करा
- अहेरी तालुक्यातील कोमटी समाजबांधवानी निवेदन देऊन केली मागणी.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : चामोर्शी येथे काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५:०० वाजता बेदम मारहाण केली, यात त्यांचे एक हात तुटुन ते गंभीर जखमी झाले आहेत, सद्या त्यांचे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कोमटी समाजात संतापाची लाट पसरली असून त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली आणि नागेपल्ली येथिल आर्य वैश्य कोमटी समाजातर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदार अहेरी मार्फत आज एक निवेदन देत पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना त्वरित निलंबित करीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या २ दिवसात कारवाई झाली नाही तर अहेरी तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद करण्याचा इशाराही या निवेदनातुन देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देतांना अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली सह अहेरी तालुक्यातील कोमटी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
News - Gadchiroli