सुरजागड यात्रेला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ओअदलपेना जय ठाकूर देव जत्रा दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करण्यात आले आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक येऊन दर्शन घेतात. यात्रा जानेवारी महिन्याच्या ५ तारीखे पासून तीन दिवस यात्रा असते .
काल या ओअदलपेन जय ठाकूर देव जत्रा दसरा महोत्सव यात्रेला आविसं अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी यांनी भेट देऊन जय ठाकूर देवाची पूजा अर्चना करून दर्शन घेतले.
यावेळी दर्शन घेतांना तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर, तालुका सचिव प्रज्वल नागूलवार, स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, स्वप्नील मडावी, मंगेश हलामी माजी सदस्य, नामदेव हीचामी नगरसेवक एटापल्ली, सुधाकर गोटा, सुरेश मट्टामी पोलिस पाटील, सैनु मट्टामी, भीमराव देवथडे, राकेश देवतडे, मनील करमरकर, संचालक, नानसू मट्टामी, बेबी हेडो, जया पुडो, सुधाकर तिम्मा तालुका अध्यक्ष भामरागड, सचिन, अक्षय मडावी, सुधाकर गावडे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli